अर्थशास्त्रीय लेखनात वारंवार येणाऱ्या काही संज्ञांचे अर्थ पुढील प्रमाणे विशद केले आहेत.
अंतर्गत काटकसरी ( इंटर्नल इकॉनॉमीज ) : उत्पादन-संस्थेचे आकारमान वाढल्यामुळे होणाऱ्या खर्चातील बचती.
अंतर्मूल्य ( इंट्रिझिक व्हॅल्यू ) : चलन ज्या वस्तूवर वा धातूवर मुद्रित केलेले असते त्या वस्तूचे वा धातूचे मूल्य.
अंशनियोजन ( पार्शल प्लॅनिंग ) : अर्थव्यवस्थेतील काही भागाचे नियोजन करून इतर भाग सामान्यपणे नियोजनाच्या कक्षेबाहेर नियोजनाच्या कक्षेबाहेर ठेवणे.
अतिरिक्त लोकसंख्या (ओव्हरपॉप्युलेशन ) : पर्याप्त लोकसंख्येपेक्षा अधिक असलेली लोकसंख्या.
अधिमूल्यन (ओव्हरव्हॅल्युएशन ) : क्रयशक्ति-समानता सिद्धांताप्रमाणे योग्य असणाऱ्या विदेश-विनिमय-दरापेक्षा आपल्या चलनाचा दर अधिक ठेवणे.
अनुप्रयुक्त अर्थशास्त्र ( अप्लाइड इकॉनॉमिक्स ) : अर्थशास्त्रीय सिद्धांतांच्या व्यावहारिक उपयोगांचा अभ्यास.
अप्रत्यक्ष कर : ज्या करांच्या बाबतीत करदात्याला ते कर स्वत: न भरता करभार दुसऱ्यावर ढकलणे शक्य असते, अशा प्रकारचे कर. उदा. विक्रीकर उत्पादन कर.
अर्थसंकल्प (बजेट) : आगामी वर्षाच्या कालखंडातील आपल्या आय व व्यय – विषयक अपेक्षा व धोरण व्यक्त करणारे शासनाने तयार केलेले अंदाजपत्रक.
अर्धविकसित अर्थव्यवस्था (अंडरडेव्हलप्ड इकॉनॉमी): ज्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात औद्योगिक विकास झालेला आहे, अशी अर्थव्यवस्था. अर्धविकसित ही सापेक्ष संकल्पना आहे.
अवमूल्यन (डिव्हॅल्युएशन ) : आपल्या चलनाचे परकीय राष्ट्राच्या चलानाचे तुलनेत मूल्य कमी करणे. यामुळे परदेशातील वस्तू महाग होतात व आयात कमी होते आणि आपल्या वस्तू परकीयांना स्वस्त झाल्यामुळे निर्यात वाढते.
अवरूद्ध खाती (ब्लॉक्ड अकाउंट्सय) : ज्या खात्यांतील रकमा काढून घेण्यास प्रतिबंध केला जातो अशी खाती.
अविकसित अर्थव्यवस्था (अनडेव्हलप्ड इकॉनॉमी) : ज्या अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास झालेला नाही अशी अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत उद्द्योगधंद्यांचा विकास झालेला नसतो व शेतीही मागासलेलीच असते.
आंतरराष्ट्रीय देव-घेवींचा ताळेबंद (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) : निर्यात केलेल्या विविध वस्तू व सेवा यांच्यासाठी राष्ट्राला मिळवायची रक्कम व अशाच आयातीसाठी राष्ट्राने द्यावयाची रक्कम यांचा ताळेबंद. हा प्रतिकूल असेल, तर राष्ट्राला तेवढे सुवर्ण निर्यात करावे लागते किंवा तेवढी तरतूद करण्यासाठी परकीय राष्ट्राकडून किंवा आंतरराष्ट्रीय चलननिधीसारख्या संस्थेकडून कर्ज मिळवावे लागते.
आंतरराष्ट्रीय व्यापरसंतुलन (बॅलन्स ऑफ ट्रेड) : दोन राष्ट्रांतील वस्तूंच्या आयात निर्यातीच्या एकूण मूल्याचे संतुलन. यात सेवांच्या आयातनिर्यातीचा समावेश नसतो.
आयातकोटा (इंपोर्ट कोटा) : कोणती वस्तू किती आयात करता येईल, ह्या दृष्टीने घातलेली मर्यादा.
आर्थिक मानव (इकॉनॉमिक मॅन) : केवळ आर्थिक प्रेरणांनुसार व्यवहार करणारा अर्थशास्त्रज्ञांनी कल्पिलेला मानव.
इतर परिस्थिती कायम राहिल्यास (सेटेरिस पॅरिबस) : तात्विक आर्थिक सिद्धांत व्यवहारात अनुभवास येणे हे विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वावर अवलंबून असल्यामुळे त्यांची परिस्थिति-सापेक्षता दर्शविणारा वाक्प्रचार.
उतरत्या प्रतिलाभाचा नियम (लॉ ऑफ डिमिशिंग रिटर्न्स) : इतर उत्पादन-घटकांचे उत्पादन प्रमाण पूर्वीचेच ठेवून एखाद्या घटकाचा अधिकाअधिक वापर केल्यास त्या घटकाच्या वापरल्या जाणाऱ्या नगांस उत्तरोत्तर कमी कमी उत्पादनफल मिळत जाते, हे तत्व.
उत्थान (टेक-ऑफ): परकीयांच्या मदतीखेरीज स्वयंगतीने पुढील विकास चालू ठेवण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता.
उत्पादन संस्था (फर्म) : उत्पादन, व्यापार ह्या क्षेत्रांतील प्रवर्तक संघटना.
उत्पादनाचे घटक (फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन) : उत्पादनप्रक्रियेस आवश्यक असलेले जमीन, श्रम, भांडवल आणि संघटन हे साधन घटक.
क्रमश:
economics khara tar agadi sarva samanya manasachya jivanche avibhajaya aang .. pan abhyasaycha mhantala tar arthashtra budhyankachi kasoti lagte
ReplyDelete. mahesh ni marathi tun arthashtrachya ya vyakhya etka chan mandlya aahet. vegla vishy hatala aahe tyani blog sathi. blog l avisit denrya pratekala vichar karayala lavnaare ithe bharpoor kahi sapdel
mazya hardik shubhecha