सामाजिक जबाबदारीचा सिद्धांत आणि मुद्रण स्वातंत्र्य सिद्धांत यांमधील फरक


सामाजिक जबाबदारीचा सिद्धांत आणि मुद्रण स्वातंत्र्य सिद्धांत यांमधील फरक

आज माध्यमांची नीतिमत्ता जोपासण्याची गरज फार तीव्र झाली आहे कारण समाजाभिमुख पत्रकारितेचे बाजाराभिमुख पत्रकारितेत परिवर्तन होत चालले आहे.
संवादप्रणालीत व संवाद साधण्याच्या माध्यमांमध्ये आमुलाग्र बदल झाल्यामुळे माहितेचे स्रोत वाढत चालले आहेत. व त्यात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे  आणि माध्यमांचा समाजावर होणाऱ्या परिणामाची शक्यता सुद्धा वृद्धिंगत होत चालली आहे. अशा या माहिती सापेक्ष असलेल्या आधुनिक समाजात माध्यमांची नीतिमत्ता हा चर्चेचा विषय होऊ पाहत आहे किंबहुना झाला आहे. आज रेडीओ, दूरदर्शन, वर्तमानपत्रे आणि डिजिटल मीडिया अशा अनेक माध्यमांद्वारे विविध प्रकारच्या बातम्यांचे वार्तांकन केले जाते. ही माध्यमे किंवा यापैकी काही आज प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनले आहे. परंतु या माध्यमांची यंत्रणा सुव्यवस्थितपणे वा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माध्यम समुहांचे प्रेरणास्थान हे समाजाभिमुख पत्रकारिता करणे हे आहे वा इतर माध्यमांबरोबर व्यावसायिक स्पर्धा करणे हे आहे? हे अभ्यासणे गरजेचे ठरते.
“फोर थेअरिस ऑफ प्रेस” (१९६३) या पुस्तकात विल्बर श्रम, फ्रेड सिबर्ट आणि थिओडर पिटर्सन यांनी माध्यमांचे चार प्रतिमाने (मॉडेल्से) मांड्ले. ज्यापैकी दोन महत्त्वाची प्रतिमाने म्हणजे सामाजिक जबाबदारीचा सिद्धांत आणि मुद्रण स्वातंत्र्य सिद्धांत जी विसाव्या शतकात समाज व माध्यमांची नीतिमत्ता या संदर्भात अनेक वेळा चर्चिले गेले आहेत. 

सामाजिक जबाबदारीचा सिद्धांत व पत्रकारिता
सामाजिक जबाबदारीच्या सिद्धांतानुसार वार्तांकन/पत्रकारिता करित असतांना सामाजिक कल्याण जोपासणे हे पत्रकारितेचे प्राथमिक व मूलभुत कार्य आहे. समाजाला हव्या असलेल्या अथवा त्यांची गरज ओळखून त्यांना सत्य माहितीचा पुरवठा करणे आणि सामान्य ज्ञान, दैनंदिन महत्त्वाच्या घडामोडी इ. बाबत माहिती पुरवून त्यांची बौद्धिक व मानसिक गरज भागविणे ही अपेक्षा समाजाद्वारे माध्यमांकडून केली जाते.
या सिद्धांतानुसार माध्यमांची नीतिमत्ता ही यंत्रणा स्वयंचलित होते कारण माध्यमे ही समाज कल्याणासाठी वा समाजहितासाठीच काम करतात व विशेष हितसंबंध असणाऱ्या गटांमार्फत वा जाहिरातदारांमार्फत आलेल्या दबावाला ते बळी पडत नाही. या सिद्धांतानुसार एक महत्वाची बाब म्हणजे पत्रकारिता करत असतांना पत्रकारांनी अथवा माध्यम समुहांनी आर्थिक लोभ दाखवून अथवा इतर आमीष दाखवून जे गट पक्षपाती (bias) आणि अनैतिक पत्रकारितेची (unethical practice of journalism ) मागणी करतात यांपासून सावध राहणे गरजेचे ठरते. नित्तिमत्तेच्या आधारे पत्रकारिता करणे व समाजातील विविध घटकांचा विकास घडवून आणणे या सिद्धांताचा मूळ आधारस्तंभ आहे. 

मुद्रण स्वातंत्र्य सिद्धांत व पत्रकारिता
सामाजिक जबाबदारीच्या तुलनेत या मुद्रण स्वांत्र्याच्या सिद्धांताचा अवलंब वर्तमानकालीन पत्रकारितेत वाढलेला दिसुन येतो. या यंत्रणेत माध्यमांच्या स्वातंत्र्यतेला कोणत्याही प्रकारची सीमा वा निर्बंध उरत नाही. ज्यावर शासन, समाज अथवा सामाजिक जबाबदारीच्या सिद्धांताचे नियंत्रण राहत नाही. या माध्यमांमध्ये मुख्यत्वेकरून दूरदर्शन हे जाहिरातींवर अबलंबून असते. आपल्या वाहिनीचे इतर जाहिरातदारांबरोबर संघर्ष अथवा मतभेद निर्माण होणार नाहीत असे अथवा त्यांच्या हितार्थ वा त्यांना हवा असलेल्या दृष्टीकोनातून ते बातम्यांची अथवा कार्यक्रमांची मांडणी करतात जेणेकरून त्यांच्यामार्फत आर्थिक मदत होत राहील.


भविष्यातील माध्यमांची नीतिमत्ता
व्यावसायाभिमुख आणि मुक्त व्यापाराभिमुख मुद्रण स्वातंत्र्य सिद्धांताच्या अवलंबामुळे अनेक समस्या समोर आलेल्या दिसुन येतात. उदा. पेड न्युज ?. ज्या बातम्यांचे वार्तांकन माध्यमांद्वारे व्हायला हवे त्या बातम्यांचे वार्तांकन होत नाही किंवा त्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसुन येते. उदा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खैरलांजी हत्याकांड वा सोमालिया संघर्ष. या तुलनेत माईकल जॅक्सनच्या मृत्युचे व शोएब मलिक व सानिया मिर्ज़ा यांच्या लग्नाचे वार्तांकन. सामाजिक जबाबदारीचे जराही भान न बाळगता माध्यमे त्यांना हवे तसे व हवे तेवढे वार्तांकन राजकीय नेत्यांवर केले जाते. ज्याचा उल्लेख माध्यमांद्वारेच “पब्लिसिटी स्टंट” म्हणून केला जातो. या आधारे आपण असे म्हणू शकतो की वर्तमानकालिन माध्यमांमध्ये सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येते. माध्यमांद्वारे ज्ञानार्जनात्मक बातम्यांच्या तुलनेत मनोरंजनात्मक बातम्यांचे वार्तांकन जास्त प्रमाणात केले जाते. माध्यमांद्वारे पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, समाजिक जागरूकता अशा प्रकारच्या विषयासंबंधित वार्ताकन फार कमी होत चालले आहे.
माध्यमांच्या स्वरूपात दैनंदिन बदल होत चालले आहेत. इंटरनेटमुळे आत माहितीच्या संक्रमणाला भौगोलिक सीमा उरल्या नाहीत. आणि माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
भविष्यात कदाचित माध्यम्यांना सामाजिक जबाबदारी व मुद्रण स्वातंत्र्य या दोन्हीही सिद्धांतांवर अवलंबून राहावे लागणार नाही कारण वाचक,श्रोते व दर्शक बातमीसाठी विशिष्ट पर्यायांवर अवलंबून राहावे लागणार नाहीत. अशा प्रकारच्या यंत्रणेत माध्यमांची नीतिमत्ता व नैतिकतेचे स्थान काय असेल हे भविष्यच जाणे.


Source-  http://medialiteracy.suite101.com/article.cfm/media_ethics_today