(Bias) बायस – प्रवृती: प्रवृती माध्यमांची, पत्रकारांची, प्रेक्षकांची, जाहिरातदारांची आणि माध्यमांमध्ये अनेकअर्थाने गुंतवणूक करणार्या सर्व प्रकारच्या लोकांची असते. काही माध्यमे कालातीत असतात. उदाहरणार्थ दगड. अशा माध्यमांचा वापर केल्यास माहितीही कालातीत होते. मात्र माहितीचे प्रसरण मर्यादित होते. काही माध्यमांनास्थलाच्या मर्यादा कमी असतात. उदाहरणार्थ कागद. कागदावरील माहिती अधिक व्यापक क्षेत्रावर प्रसरण पावूशकते. मात्र कागदाचा काळ दगडापेक्षा कमी असतो. साम्राज्यांचा काळ आणि क्षेत्र हे त्या साम्राज्यात वापरातयेणार्याा माध्यमांवर आणि त्यांच्या प्रवृतींवर अवलंबून असतो असा सिद्धांत हॅरॉल्ड इनिस या कॅनेडातीलअभ्यासकाने सर्वप्रथम मांडला. माध्यमांच्या प्रवृत्ती असतात व त्या ओळखणे गरजेचे असते यावरून मार्शलमॅक्लुहान याने माध्यमे ही माणसाच्या ज्ञानेंद्रियांचा विस्तार करतात असा सिद्धांत पुढे मांडला. उदाहरणार्थ रेडिओहा माणसाच्या श्रवणेंद्रियाचा तर वर्तमानपत्रे आणि कॅमेरा डोळ्याचा विस्तार करतात.
माध्यमांच्या प्रवृत्तींमुळे संदेशवहनाला मर्यादा पडतात आणि काहीवेळा केवळ माध्यम प्रवृतीमुळे संदेश पोहोचतनाही अथवा त्यातून वेगळाच अर्थ पोहोचतो. त्यामुळे संदेशाबरोबर तो कुठल्या माध्यमाद्वारे पोहोचवला जातोआहे याला देखील महत्त्व प्राप्त होते. एखादा संदेश जर लोकांच्या पचनी पडणारा नसेल तरी योग्य माध्यमवापरले तर लोकांपर्यंत पोहोचवता येतो. म्हणजेच संदेशापेक्षा कधी कधी माध्यम आणि त्याच्या प्रवृतींमुळे संदेशजास्त परिणामकारक होतो. य़ावरूनच माध्यम म्हणजे एकप्रकारची संदेशाची मालिश (medium is the massage) किंवा माध्यम म्हणजेच संदेश (medium is the message) असा सिद्धांत मॅक्लुहानने मांडला.
प्रेक्षकांच्याही प्रवृत्ती असतात आणि पत्रकारांच्याही. वस्तुनिष्ठता ही जरी पत्रकाराला बंधनकारक असली तरी तीनेहमीच शक्य नसते याचे कारण म्हणजे माणसातील प्रवृत्ती. अशा प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करणे शक्य नसते. म्हणून न्याय्य असणे, समतोल राखणे, सर्व बाजू व पैलू मांडणे इत्यादींचा आग्रह धरला जातो. माहितीच्यासार्वत्रिकरणाचा जसा प्रेक्षकांवर परिणाम होतो तसाच तो पत्रकारांवरही होतो. माहिती सहज उपलब्ध होते, अनेकमार्गांनी उपलब्ध होते यामुळे कुठली बातमी महत्त्वाची आहे याचे आकलन कठीण होऊन जाते. मग व्यक्तिगतप्रवृत्तींचा प्रभाव वाढतो. हा प्रभाव नकळत, सूप्त असू शकतो.
प्रेक्षकांच्या प्रवृतींचा माध्यमांवर प्रभाव असतो. प्रेक्षक जर स्वत:च्या वास्तवाबाबत आणि त्यातून निर्माणहोणार्याा त्यांच्या प्रवृत्तींबाबत चिकित्सक असतील तर पत्रकारितेचे स्वरूप तसे होते मात्र जर प्रेक्षक आग्रहीआणि असहिष्णु असतील तर पत्रकारितेचे स्वरूपही तसेच होते.
Translated By - Sanjay Ranade
Dept Of Communication and Journalism,
University of Mumbai
अधिक माहितीसाठी वाचा:
Glasgow Media Group (1976) Bad News, London: Routledge and Kegan Paul.
Tuesday, March 30, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment