(Censorship) सेंसरशिप – सेंसर म्हणजे मुद्रण नियंत्रक. अशा नियंत्रण करण्याला सेंसरशिप म्हणतात. यानियंत्रण प्रक्रियेचे काही घटक आहेत. एक म्हणजे असे नियंत्रण केवळ मुद्रण क्षेत्राशी सबंधित नसून माहिती आणितंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वच्या सर्व माध्यमांशी सबंधित आहे. दुसरे म्हणजे माहिती मिळवण्यावर आणि तिच्याप्रसारणावर नियंत्रण करता येऊ शकते. तिसरे म्हणजे असे नियंत्रण केवळ सरकारी पातळींवर आणि सरकारीसंस्थांकडूनच होते असे नाही तर समाजाच्या विविध स्तरावर असे नियंत्रण केले जाते. शेवटचे म्हणजे असेनियंत्रण सरकारी पातळीवर होतेच, मग ते सरकार कुठल्या तत्त्वांचा, मतांचा, विचारांचा अवलंबन करत आहेयामुळे फरक पडत नाही.
भारतामध्ये अशा नियंत्रणाला ब्रिटिश काळातच सुरुवात झाली होती. 2 सप्टेंबर 1780 रोजी जेम्स ऑगस्टस हिकीयाच्या बंगाल गझेट या वर्तमानपत्राच्या वितरणावर ब्रिटिशांनी बंदी आणली होती. 1823 साली जेम्स सिल्कबकिंघमच्या कलकत्ता गझेट वर आणलेली बंदी सर्वाधिक गाजली कारण बकिंघमने या बंदी विरूद्ध इंग्लिशकोर्टात दाद मागितली आणि 1834 साली त्याला वर्षाला पाचशे पाउंड इतकी रक्कम भरपाई म्हणून देण्यात आली. 13 मे 1799 साली लॉर्ड वेलेस्ली याने भारतात वर्तमानपत्रांवर नियंत्रण लागू केले. याअगोदर प्रत्येकवर्तमानपत्राला मजकूर छापण्याअगोदर सरकारला दाख़वणे बंधनकारक होते. वेलेस्लीने प्रत्येक वर्तमानपत्रावरसंपादक, मुद्रक आणि मालक यांची नावे प्रसिद्ध करणे बंधनकारक केले.
यानंतर अनेक कायद्यांद्वारे माहितीवर आणि पर्यायाने वर्तमानपत्रांवर नियंत्रण करणे सुरूच होते. याप्रक्रियेतूनच प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचा जन्म झाला. वर्तमानपत्रांनी स्वत:च स्वत:वर नियंत्रण ठेवावे असा यामागचा हेतू होता.
राजकीय अर्थकारणाचा सिद्धांत मांडणार्यां अभ्यासक़ांनी म्हटले आहे की खाजगी संस्थांनी गेल्या दोन दशकातमाध्यम संस्थांवर आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे आणि जाहिरातदारांना हाताशी धरून त्यांनी आता एकप्रकारेसंमतीचे उत्पादन’च आरंभिले आहे. पत्रकार स्वत:वर नियंत्रण लादतात आणि यातून या ख़ाजगी माध्यमसंस्थांना असे ‘संमतीचे उत्पादन’ करता येते असे या अभ्यासकांचे मत आहे. यासाठी आता सरकारी नियंत्रणाचीआवश्यकता उरलेली नाही.
अधिक माहितीसाठी वाचा:
Durga Das Basu, Law of the Press, 2002, Wadhwa Nagpur.
Parthasarthy Rangaswami, Journalism in India, From the earliest times to the present day, Sterling Publishers Private Limited, 1989.
Herman and Noam Chomsky, Manufacturing Consent
By Sanjay Ranade,
Dept of Communication and Journalism,
University Of Mumbai. ‘
Tuesday, March 30, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment